
सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट यांचे विशेष उल्लेखनीय कार्य
दादर येथील सरस्वती विद्या विकास ट्रस्टचे उल्लेखनीय कार्य म्हणजे श्रीमंतांकडून गरीबांकडे निधी वाटण्याचे आहे. समाजात आर्थिक समतोल साधण्याचे काम ही संस्था मोठ्या उत्साहात व आदराने करत आहे.
या संस्थेच्या सचिव श्रीमती उज्वलाताई पवार यांचा या कार्यात सिंहाचा वाटा आहे. टिटवाळा येथील गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला साधारण दरवर्षी उज्वलाताई मदत करीत असतात. आमच्या शाळेला पहिली मदत वाद्यांसाठी निधी मिळाला. तेव्हापासून अनेक कार्यक्रमात व गणेश जयंतीला या वाद्यांचे सूर दरवर्षी घुमतात. आमच्या शाळेतील गरीब, होतकरू व शिक्षणाची आवड असलेल्या राजू शिंदे या विद्यार्थ्याच्या सी.ए. शिक्षणासाठी त्यांनी ४० हजार रुपयांची मदत केली त्यामुळे हा हुशार मुलगा सी.ए. होऊन उच्च पदवी नोकरी करीत आहे. आमच्या शाळेत दिलेल्या निधीतून दुर्बीण बसवून विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाचा लाभ मिळाला आहे.
निधी वाटप उपक्रम साधारण जुलै किंवा ऑगस्टमध्ये असतो. या उपक्रमास प्रोत्साहन सोहळा असे दिलेले कल्पक नाव मला आवडले आहे. समाजातील काही व्यक्ती स्वतःला झोकून शून्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करतात. त्यांना हा निधी दिला जातो. आर्थिक परिस्थितीत बिकट असलेल्या विद्यार्थ्यांनाही निधी दिला जातो. विविध भागातील संस्था व विद्यार्थी या निधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन सोहळ्यास उपस्थित राहतात. समाजातील तळागाळातील संस्थांनी व विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी या हेतूने ही संस्था अविरत प्रयत्न करत आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास माझा सलाम.
सौ मंजुषा बुरुजवाले डोंबिवली
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
माजी मुख्याध्यापिका गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टिटवाळा
गीताव्रती, योग अध्यापक व योग पंडित
