सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट दादर, मुंबई यांच्या सहकार्याने झापवाडी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाले.
शैक्षणिक साहित्याचे वाटप ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.किरण निमसे ,आदिवासी आघाडीचे प्रमुख श्री.नरसु गावंडा , ग्रुप ग्रामपंचायतीचे सद्स्य श्री.रविंद्र मेंगाळ , केंद्रप्रमुख श्री.पवार सर व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.तसेच स्वयंपाकी ताई सौ.लिलाताई मेंगाळ यांना साडीचोळी देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.






