Top 5 This Week

Related Posts

श्री. राजू शिंदे यांची यशोगाथा

राजू शिंदे

आज माझ्याकडे सी.ए. अशी अतिशय महत्वाची पदवी आहे. पण सी.ए. होण्याचा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास करण्याची इच्छाशक्ती आणि प्रेरणा आमच्या टिटवाळा येथील गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा बुरुजवाले मॅडम यांच्याकडून मिळाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मी टिटवाळा येथे राजर्षी शाहु महाराज या मुलांच्या वसतिगृहात राहत असे. तेथून जवळच असलेल्या गणेश विद्यालयात मी पाचवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मी शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला. पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळाचं काय? असा माझ्यापुढे प्रश्न होता. पण बुरूजवाले मॅडमनी माझा हा प्रश्न सोडवला. दादर येथील सरस्वती विद्या विकास ट्रस्ट या संस्थेच्या विश्‍वस्त उज्ज्वला पवार यांच्याकडून मला ५० हजार रुपयांपेक्षा अधिक मदत मिळवून दिली. घरातील अडचणींचा सामना करत मी खूप मेहनत केली.
ती मदत नुसती मदत नसून माझ्या उज्ज्वल भविष्याचा पाया होती. ती मदत जर मला मिळाली नसती तर मी पुढील शिक्षण कधीच घेऊ शकलो नसतो.
माझ्या आयुष्याचा पाया रोवण्यासाठी जेवढी मेहनत माझ्या बुरुजवाले मॅडम आणि माझ्या मोठ्या ताईने केली तेवढीच महत्त्वाची भूमिका उज्ज्वला पवार मॅडमने सुध्दा पार पाडली.
प्रत्येकवर्षी सरस्वती विद्या विकास ट्रस्ट खूप लोकांना आर्थिक सहाय्य करतात, त्या कार्यक्रमा मधे मला आवर्जून बोलावतात आणि मी सुद्धा आवर्जून जातो.
आज मी UTI Asset Management Company Limited मधे Associate Vice President आहे, पण त्यांनी केलेल्या मदतीची मी परतफेड कधीच करू शकणार नाही कारण माझ्यासाठी ती वेळ खूप महत्वाची होती.
जेवढी मला माहिती आहे उज्ज्वला पवार मॅडम खूप समाज कार्य करत असतात आणि सरस्वती विद्या विकास ट्रस्ट च नाव मोठे करत आहेत.
मी नमन करतो त्यांच्या समाज कार्याला आणि सरस्वती विद्या विकास ट्रस्टला.
माझ्यासारख्या अनेकांना उत्तुंग भरारी घेण्यास बळ देणाऱ्या या माऊलीला आणि सरस्वती विद्या विकास ट्रस्टला शतशः प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles