एका दैनिकात सेवाश्रमचा लेख वाचल्यानंतर आदरणीय उज्ज्वला ताईंचा संपर्क सुरू झाला, याला आता सात वर्षे उलटून गेली आहेत. सेवाश्रम मधील अनेक नवीन बदल सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातुन होऊ शकले आहेत. आमची मुले कापडी पिशव्या तयार करतात, यासाठी आम्हाला शिलाई मशीन असतिल यासाठी कापड असेल किंवा दरवर्षी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे सेवाश्रम मधील जगणे सुसह्य करण्यासाठी सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट चा हातभार लागत असतो किंबहुना ती एक मातृसंस्था आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्थाना प्रेरक मदत उज्ज्वला ताई करत असतात. वार्षिक कार्यक्रम तर आम्हा सर्वांसाठी उत्साहा प्रमाणे असतो. अनेक देणारे आणि गरज असणाऱ्यांचे जाणीवपूर्वक नाते निर्माण करणारी ही संस्था आहे. प्रत्येक वेदनेशी ममत्वाचे नाते निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संचय उज्ज्वला ताई पवार यांनी केल्याने सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक गरजवंताना मदत मिळत आहे…..
—– सुरेश राजहंस. संस्थापक — सेवाश्रम, बीड.