HomeBlogश्रीसद्गुरु रिद्धीनाथबाबा माध्यमिक विद्यालयची महिती आणि एस.डी.विद्या विकस ट्रस्ट विषयी व्यक्त केलेली...

श्रीसद्गुरु रिद्धीनाथबाबा माध्यमिक विद्यालयची महिती आणि एस.डी.विद्या विकस ट्रस्ट विषयी व्यक्त केलेली कृतज्ञताविद्यालय

विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्था शहापूर संचलित श्रीसद्गुरु रिद्धीनाथबाबा माध्यमिक विद्यालय, खरीड, ता. शहापूर, जि. ठाणे ही शाळा आदिवासी, डोंगराळ व दुर्गम भागात असून या ठिकाणी शिकणारे विदयार्थी आदिवासी, गोरगरीब, कष्टकरी व शेतकरी कुटुंबातील आहेत. मराठी माध्यमाच्या या शाळेत विद्यार्थी खरीड परिसरातील कानाकोपऱ्यातून येत असले तरी अनेक वेळा भौतिक सुविधा व शैक्षणिक संसाधनांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुचंबना होताना दिसून येते. अशावेळी श्रीसरस्वती विद्याविकास ट्रस्ट, दादर यांच्या मदतीचा हात बुडत्याला काठीचा आधार असाच ठरतो. शाळेमध्ये क्रीडा साहित्य, वाचनालयाची पुस्तके, ग्रीन बोर्ड, लॅपटॉप आणि इतर साहित्याची मदत केल्याने शाळेतील आठवीचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले आणि एक विद्यार्थीनी रँकिंग मध्ये आली. क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये तालुक्याला जिंकून जिल्हा पातळीवर पाय रोवण्याचे काम या छोट्याशा शाळेला करता आले. याचे सर्व श्रेय श्रीसरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट व अध्यक्षा आदरणीय उज्वलाताई पवार मॅडम यांना जाते. आपल्या अनमोल सहकार्याबद्दल खूप खूप आभार.

  • एकनाथ तारमळे सर, मुख्याध्यापक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments